माधुरी दीक्षित 'या' नव्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या भेटीला ; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

माधुरी दीक्षित 'या' नव्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या भेटीला ; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुुंबई - बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आपल्या नृत्यकौशल्याने, अभिनयाने आणि मोहक हास्याने प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच अधिराज्य गाजवत आली आहे. मात्र यावेळी ती अशा भूमिकेत झळकणार आहे जी तिच्या चाहत्यांनी कधीच पाहिलेली नाही. ‘मिसेस देशपांडे’ या नव्या चित्रपटात माधुरी पूर्णपणे वेगळ्या लूक आणि अंदाजात दिसणार असून निर्मात्यांनी तिच्या भूमिकेचा पहिलाच लूक - टीझर प्रदर्शित केला आहे. जिओहॉटस्टारने या बहुचर्चित थ्रिलरचा प्रीमियर जाहीर केला असून कथेत अनेक गूढ स्तर दडले असल्याचे संकेत मिळतात.

टीझर प्रेक्षकांना एक थरारक, गूढ वातावरणात घेऊन जातो. डी - ग्लॅम लूकमध्ये माधुरी शांतपणे भाजी चिरत असताना रेडिओवर एक सिरियल किलर पळून गेल्याची बातमी ऐकू येते. या दृश्यातूनच कथानकाची भयावह दिशा उलगडते. नागेश कुकुनूर दिग्दर्शित आणि अप्लॉज एंटरटेनमेंट व कुकुनूर मूवीज निर्मित या सीरीजमध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि प्रियांशू चॅटर्जी यांचीही महत्त्वाची भूमिका असेल.

https://www.instagram.com/reel/DRPBaj4DEj9/?utm_source=ig_web_copy_link

माधुरी दीक्षित काय म्हणाली ?

मिसेस देशपांडे ही भूमिका माझ्यासाठी पूर्णपणे नवी आहे. ती रॉ आहे, अनफिल्टर्ड आहे आणि माझ्या नेहमीच्या ग्लॅमरस इमेजपासून खूप दूर आहे. इतक्या ग्रे शेड्स असलेली व्यक्तिरेखा पहिल्यांदाच साकारताना थरारक अनुभव आला, असे माधुरीने सांगितले.

दिग्दर्शक नागेश कुकुनूर म्हणाले, मिसेस देशपांडेचा प्रवास माझ्यासाठी विलक्षण ठरला. स्क्रिप्ट लिहितानाच मला या भूमिकेत केवळ माधुरीच दिसत होती. इतक्या गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखेचा तिने उत्तमरीत्या निभाव केलेला अभिनय मोठं भाग्य आहे, असे यांनी सांगितले. आता माधुरी दीक्षितचा हा नवा, गूढ आणि धक्कादायक अवतार प्रेक्षकांना १९ डिसेंबर २०२५ रोजी पाहायला मिळणार आहे.