सावंतवाडी येथे साईनाथ मल्टीस्टेट शाखेचा शानदार शुभारंभ
सावंतवाडी (प्रतिनिधी): महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात कार्यरत असणारी ‘साईनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड’ आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील सुरू झाली आहे. २२८ कोटी ठेवींचा टप्पा या संस्थेने पार केला असून संस्थापक अध्यक्ष उत्तम जाधव व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी शाखेचा शानदार शुभारंभ करण्यात आला.

या नव्या शाखेचं भव्य उद्घाटन आज करण्यात आले. सृष्टी इम्पेरिया, बाजारपेठ येथे हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. या निमित्ताने नूतन शाखेमध्ये श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विश्वासाहर्तेच्या जोरावर आम्ही यश संपादन केल आहे. सावंतवाडीत आम्ही आज शुभारंभ केला असून लवकरच कर्नाटक राज्यात देखील आमची शाखा सुरू होणार आहे. सभासद, ठेवीदार, पिग्मी खातेदार, ग्राहकांच्या विश्वासामुळेच आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास संस्थापक अध्यक्ष उत्तम जाधव यांनी व्यक्त केला.
या शुभारंभाचे औचित्य साधून सावंतवाडीतील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा साईनाथ मल्टीस्टेटकडून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी साईनाथ मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष उत्तम जाधव, महिला कॉग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, संचालक प्रा. डॉ. सुरेश चौगुले, सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबेळकर, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, डॉ. संदीप सावंत, संचालक आनंद कांबळे, विजय कांबळे, महेश पाटील, अमर कुंभार, एकनाथ घोरपडे, कृष्णकांत सुतार, विशाल भांदिगरे, उमेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, आनंद ठोंबरे, शैलेश पै, शिवाजी शेडगे, नीरज देसाई, प्रा. रूपेश पाटील, अमित परब, सुशील चौगुले, प्रदीप प्रियोळकर, श्री. सातावळेकर, बिझनेस हेड अभिजीत संभाजी, सिनीयर मॅनेजर श्रीकांत हसकर, मॅनेजर शशांक विचारे, सावंतवाडीतील साईनाथ मल्टीस्टेटचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




