मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला राठोडांची तिलांजली; हेलिकॉप्टरसह 20+ वाहनांचा ताफा
मुंबई (प्रतिनिधी) : आखाती देशातील युद्धामुळे देशभरात इंधनाचे मोठे संकट उभं राहीलं आहे. परिणामी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेते मंडळी तसेच सर्वच राज्य सरकारला इंधन बचतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील अनेक नेते मंडळींनी प्रतिसाद सुद्धा दिला. मात्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा वास्तू संग्रहालयाची पाहणी करण्यासाठी नागपूर ते पोहरादेवी असा हेलिकॉप्टरमधून प्रवास केला.सोबतच मोठा शासकीय वाहनाचा ताफा घेऊन पोहरादेवी येथील वास्तू संग्रलायची पाहणी देखील केली. यावेळी मंत्री संजय राठोडसह विजय दर्डा त्यांच्या दौऱ्यात सोबत होते.

एकीकडे देशावर इंधन संकट असताना मंत्र्यांकडूनच अशी इंधनाची उधळपट्टी होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला मंत्र्यांकडून तिलांजली दिल्या जात असल्याच दिसत आहे. मंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यात 20 पेक्षा अधिक शासकीय वाहने आणि खासगी जवळपास15 वाहने ताफ्याचा लवाजमा घेऊन हा पाहणी दौरा केल्याने मंत्री संजय राठोड पुन्हा एकवेळा वादात सापडण्याची चिन्ह आहे.
दरम्यान, यावर बोलताना मंत्री संजय राठोड यांनी सारवासारव करत प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचा आवाहन केलेलं असतांना मंत्री संजय राठोड यांचा हेलिकॉप्टर दौरा आणि शासकीय वाहनांचा मोठा ताफा वाशिमच्या पोहरादेवी बघायला मिळाला होता. यावर संजय राठोड यांनी सारवा सारव केली असून माध्यमांनी प्रश्न विचारला असता आम्ही वाहनांचा ताफा निम्मा केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला आम्ही सर्वच मंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा प्रतिसाद देत असल्याचे सांगितलं. प्रत्यक्षात मात्र संजय राठोड यांच्या ताफ्यात 20 ते 22 शासकीय वाहन असल्याचं बघायला मिळालं होतं.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे रखरखत्या उन्हात उपोषण करत असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समजूत घालत आहेत. आज सायंकाळपर्यंत चांगली गोड बातमी येईल, असा मोठा दावा मंत्री संजय राठोड यांनी माध्यमांशी बोलताना केलाय. तर बंजारा आरक्षणासंदर्भातही माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आले असून तीन महिने हा आयोग राज्यभर फिरून सर्वांचे मतं जाणून घेणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकारकडे शिफारस करणार आहे. अशीही माहिती त्यांनी दिलीये.




