श्रीमती आंबुबाई श्रीपती पाटील यांचं निधन
कोल्हापूर (प्रतिनिधी) - म्हाकवे येथील कै. श्रीमती आंबुबाई श्रीपती पाटील यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.
राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस को-ऑप. बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक मधुकर श्रीपती पाटील (एम.एस) व मा.डे.सरपंच रामचंद्र श्रीपती पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.




