डॉ. अनुप्रिया गावडे क्रांतीसुर्य युथ आयडॉल पुरस्काराची मानकरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) - शांतिनिकेतन स्कूल मध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विश्वविक्रमवीर ग्लोबल ब्रँड अँबेसिडर भारत विभूषण डॉ. अनुप्रिया गावडे या विद्यार्थिनीचे क्रांतीसुर्य शिक्षण विकास संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या यावर्षीच्या युथ आयडॉल आयकॉन पुरस्कारासाठी निवड झाली असून, ४ सप्टेंबर रोजी, शिर्डी येथे होणाऱ्या भव्य समारंभात हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे. तिने सध्याच राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून आपल्या वक्तृत्व शैलीचे दर्शन घडविले होते.
भारतीय संविधान व बाल हक्क कायदा तोंडपाठ असलेल्या अनुप्रिया गावडे यांच्या नावे पाच विश्वविक्रम नोंदविले गेले असून ती अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांचे संविधान व बालहक्क कायद्याचे जागृती करण्यासाठी अँबेसिडर म्हणून काम करीत आहे आजपर्यंत आठ हजार लोकांपेक्षा अधिक जणांना संविधानाबद्दल जागृती निर्माण केली असून तिने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
आजपर्यंत नव्वदहून होऊन अधिक सुवर्णपदके आणि 60 हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय व प्रादेशिक स्तरावरील पुरस्कार प्राप्त केले असून क्रीडा क्षेत्रातही तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लहानपणापासून उपजत वक्तृत्व कौशल्य प्राप्त केलेल्या अनुप्रियाने शालेय स्तरावर अनेक वक्तृत्व स्पर्धेतील बक्षिसे पटकाविले आहे. त्यासोबत तीने भारताची सुपर स्पीकर होण्याचा मान देखील पटकाविला होता.
ब्रिलियंट अकॅडमीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावले व व्हिझक्लब कार्निवलच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑल इंडिया किड्स प्रीमियर लीग या मास्टर ऑरेटर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तिचे कामगिरीचे विशेष दखल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मासिकानी घेत तिची यशोगाथा प्रसिद्ध केली आहे.
कला, क्रीडा, अभ्यास अशा सर्व क्षेत्रामध्ये आपल्या बुद्धिमत्तेची चमक तिने दाखविली आहे. तिला शाळेच्या संचालिका सौ.राजश्री काकडे मॅडम, प्राचार्या जयश्री जाधव व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. ती प्रसिद्ध सनदी लेखापाल अमित गावडे व नाइट कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ.अक्षता गावडे यांची कन्या आहे.