करवीर जिल्हा परिषद मतदारसंघात कोण मारणार बाजी? कोण जिंकणार मैदान?

करवीर जिल्हा परिषद मतदारसंघात कोण मारणार बाजी? कोण जिंकणार मैदान?

करवीर (विश्वनाथ मोरे) - गेली तीन वर्षे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका प्रलंबित होत्या. आता आरक्षण सोडतीनंतर करवीर जिल्हा परिषद मतदारसंघात कोण मारणार बाजी ? आणि कोण जिंकणार मैदान ? नव्यांना संधी, हालचाली गतीमान झाल्या आहेत.

       

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात झालेल्या राजकीय पक्षांच्या दुभांगानंतर प्रथमच या निवडणूक होत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार चुरस होण्याची शक्यता आहे. 

करवीर तालुक्यात १२ जिल्हा परिषद गटापैकी ७ गट खुले झाले आहेत. करवीर तालुका दोन विधानसभा मतदारसंघात विभागला आहे. यामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघात ६ गट, तर कोल्हापूर दक्षिण मध्ये ५ गट समाविष्ट आहेत. यातील निगवे खालसा हा गट दोन विधानसभा मतदारसंघात विभागाला गेला आहे. 

करवीर विधानसभा अतंर्गत येणाऱ्या गटातील निवडणुकीमध्ये शिवसेना व काँग्रेस अशी होणारी लढत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गटात ) प्रवेश केल्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि सतेज पाटील यांच्या समवेत असणारी काँग्रेस यांच्यामध्ये होणार आहे. यामध्ये शिवसेना ( उ.बा.ठा ) गट आणि शेकाप संपतराव पवार पाटील यांच्या गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महिलेसाठी खुले झाल्याने करवीर विधानसभा मतदारसंघातील शिंगणापूर व सांगरूळ तसेच दक्षिण मधील कळंबे तर्फे ठाणे या ठिकाणी काटा लढती होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या सभागृहात एकूण २१ गट ( जागा ) खुले झाले आहेत, यातील सर्वाधिक म्हणजेच सात जागा करवीर तालुक्यात आसल्यामुळे जिल्हा परिषदेचे कारभारी होण्यासाठी सर्वच ठिकाणी प्रतिष्ठेच्या लढती होणार आहेत. दरम्यान गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांची कोणत्या पक्षाबरोबर जाणार ही भूमिका अद्यापही गुलदस्त्यात असल्यामुळे या ठिकाणच्या उमेदवाराची उत्कंठा लागून राहिली आहे. 

करवीर विधानसभा मतदार संघातील सांगरूळ जिल्हा गट हा गट महिलांसाठी खुला झाल्याने अनेकांनी आपल्या सौभाग्यवतींसाठी तयारी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीकडून प्रकाश मुगडे, बाळासाहेब खाडे, तर नरके गटाकडून सुशांत नाळे यांनी आपल्या आईसाठी ,तर राहुल खाडे, निवास वातकर, प्रकाश कुंडलिक पाटील (आमशी ) यांनी पत्नीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. राजेंद्र सूर्यवंशी, सचिन पाटील यांनी आपली भूमिका वेट अँड वॉच अशीच ठेवली आहे.

पाडळी खुर्द गटातून राजेंद्र सूर्यवंशी, सचिन पाटील, पृथ्वीराज सूर्यवंशी, चेतन पाटील, डॉ.के. एन. पाटील या प्रमुख तर ऐन वेळी इच्छुकांचीही जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. शिंगणापूर गटातून अमर पाटील, राजेंद्र दिवसे, अविनाश पाटील, बाळ पाटील यांच्या पत्नी तर कुडित्रेच्या माजी सरपंच जोत्स्ना पाटील आदी इच्छुक आहेत.

सडोली खालसा गटातून क्रांतिसिंह पवार पाटील, सुवित पाटील, बाबासाहेब देवकर, सचिन पाटील यांच्यासह राहुल पाटील यांच्या घरातील उमेदवार असण्याचीही शक्यता आहे. निगवे खालसा गट दोन विधानसभा मतदारसंघात विभागल्याने नेते सुचवतील त्या नावाला सर्वांना पसंती द्यावी लागेल. वडणगे गटात शिवसेनेकडून इंद्रजीत पाटील, बाजीराव पाटील, रवींद्र पाटील व सचिन चौगुले यांनी तयार केली आहे तर शिये गटातून बाजीराव पाटील, विश्वनाथ पाटील, प्रदीप पाटील - भुयेकर, प्रभाकर काशीद यांनी तयार केली आहे. 

करवीरमध्ये सर्वच मतदारसंघात उमेदवारी इच्छूक जास्त असल्याने मी च योग्य उमेवार कसा ? हे पटवून देण्यासाठी नेत्यांनकडे चढाओढ आहे. उमेदवार निवडतांना नेत्याचा कस लागणाार आहे . करवीर तालुक्यामध्ये प्रामुख्याने विधानसभा मतदारसंघात नरके गट व काँग्रेस आणि राहुल पाटील यांचा (अजित पवार राष्ट्रवादी गट ) यामध्ये चुरस पहावयास मिळणार आहे. तर दक्षिण मध्ये भारतीय जनता पार्टीचे आ. अमल महाडिक व आ. सतेज पाटील काँग्रेस गट यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे .