कुर्बानीला विरोध, तरी परवानगीची मागणी; भाजप नेत्यावर स्पष्टीकरणाची वेळ

कुर्बानीला विरोध, तरी परवानगीची मागणी; भाजप नेत्यावर स्पष्टीकरणाची वेळ

मुंबई (प्रतिनिधी) : बकरी ईदला सोसायटीमध्ये बकऱ्यांची कुर्बानी देऊ नये म्हणून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यासह इतर नेते जोरदार विरोध करत होते आणि यावरून अनेक सोसायटीमध्ये वादही झाल्याचे समोर आलं आहे. घाटकोपरच्या सागर पार्कमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाऊन जोरदार विरोध केला. मात्र, दुसरीकडे याच सोसायटीचे सेक्रेटरी भाजपचे ईशान्य मुंबईचे महामंत्री चंद्रकांत मालकर आणि धक्कादायक म्हणजे त्यांनीच यासाठी परवानगी मागितली असल्याची बाब समोर आली आहे.

चंद्रकांत मालकर हे भाजपचे ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष असून ते सागर पार्कचे सेक्रेटरी देखील आहेत. त्यांनीच कुर्बानीसाठी परवानगी मागितली होती आणि त्यामुळे आता त्यांना पक्षाकडून खुलासा मागण्यात आलेला आहे. भाजपने नेते किरीट सोमय्या यांनी पत्र लिहून याप्रकरणी रोष व्यक्त केला आहे. तर भाजपच्या ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक दळवी यांनी याबाबत खुलासा देखील मागितला आहे. 

गेल्या दोन दिवसापासून भाजप आणि इतकाही संघटना कुर्बानीच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्या होत्या, मात्र घाटकोपरमध्ये सागर पार्क आहे, त्या ठिकाणी किरीट सोमय्या यांनी कुर्बानीला जोरदार विरोध केला होता, मात्र ज्यावेळी चंद्रकांत मालकर यांनी कुर्बानीची परवानगी मागितली होती ते समोर आले आहे, त्यानंतर आता त्यांना खुलासा द्यावा लागणार आहे. 

कुर्बानीसाठी सोसायटीकडून एक पत्र देण्यात आलं होतं. त्या पत्रावरती चंद्रकांत मालकर यांची सही आहे, त्यांच्या सहीनंतर ती परवानगी मागितली होती, त्यामुळे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यांनी याप्रकरणी चंद्रकांत मालकर यांना एक पत्र लिहिले आहे, त्यामधून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष दीपक दळवी यांनी देखील याप्रकरणी चंद्रकांत मालकर यांना खुलासा मागितला आहे. या प्रकरणांमध्ये पक्षाकडून नाराजी व्यक्त केले जात आहे याप्रकरणी चंद्रकांत मालकर काय खुलासा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

एकीकडे बकरी ईदला सोसायटीमध्ये बकऱ्यांची कुर्बानी देऊ नये म्हणून भाजपचे किरीट सोमय्या यांच्यासह इतर नेते जोरदार विरोध आणि राडे करीत होते. घाटकोपरच्या सागर पार्कमध्ये ही किरीट सोमय्या यांनी जाऊन जोरदार विरोध केला होता. मात्र दुसरीकडे याच सोसायटीचे सेक्रेटरी भाजपचे ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री आहेत, त्यांनीच यासाठी परवानगी मागितल्याचे समोर आले आहे. चंद्रकांत मालकर हे भाजपचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष असून ते सागर पार्क सोसायटीचे सेक्रेटरी आहेत. त्यांनीच या कुर्बानी साठी परवानगी मागितल्यचे समोर आले आहे. यामुळे आता त्यांना पक्षाकडून खुलासा मागण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांना पत्र लिहून रोष व्यक्त केला आहे. तर भाजपचे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष दिपक दळवी यांनी त्यांचा या बाबत खुलासा मागितला आहे.