डी.वाय.पाटील टेक्निकल कॅम्पसचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
कोल्हापूर (प्रतिनिधी): डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. बेंगळुरू येथे झालेल्या इंडिया एलीट एजुकेशन अवार्ड सोहळ्यात ‘वर्षातील उत्कृष्ट आणि विश्वसनीय अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय’ म्हणून महाविद्यालयाला सन्मानित करण्यात आले. विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी या पुरस्काराबद्दल सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचे हे फलित असल्याचे सांगितले.

संस्थेची गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणाली, उत्कृष्ट प्रशासन, दर्जेदार प्लेसमेंट आणि आधुनिक पायाभूत सुविधा या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पुरस्कार देण्यात आला आहे.
महाविद्यालयात झालेल्या विशेष समारंभात विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी या पुरस्काराबद्दल आतिशय आनंद व्यक्त करताना सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, महाविद्यालयाचे संचालक डॉ. सतीश पावसकर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील, डीन अकॅडेमिक्स प्रा. राजेंद्र एस. पवार, आयक्यूएसी समन्वयक केदार के. सहस्रबुद्धे, असिस्टट रजिस्ट्रार जे. ए. पवार आदी उपस्थित होते.
पुरस्कारासाठी आयक्यूएसी (IQAC) समन्वयक केदार के.सहस्रबुद्धे यांचे विशेष योगदान लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील यांनी या पुरस्काराबद्दल सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले.




