आर्ची- परश्याचा मस्तीखोर अंदाज चर्चेत; फोटो पाहून चाहते फिदा

आर्ची- परश्याचा मस्तीखोर अंदाज चर्चेत; फोटो पाहून चाहते फिदा

मुंबई (प्रतिनिधी) : 'सैराट' चित्रपटाला प्रदर्शित होऊन 10 वर्षे झाली तरी आर्ची आणि परश्याची जोडी आजही प्रचंड लोकप्रिय आहे.अर्थात ही भूमिका निभावणारे कलाकार रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांना या सिनेमानं एका रात्रीत सुपरस्टार केलं.रिंकू राजगुरु तिच्या नव्या प्रोजेक्टमुळे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधील तिच्या उपस्थितीमुळे कायम चर्चेत असते.

पण बऱ्याच दिवसांनी आकाश ठोसर रिंकू राजगुरूसोबत एका कार्यक्रमाला दिसला. एकमेकांसोबत पोज देत त्यांनी सर्वांचाच लक्ष वेधलं.सैराट चित्रपटात भूमिका साकारताना रिंकू आणि आकाश दोघेही लहान होते. खूप कमी काळात त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.त्यानंतर दोघांनीही मराठीतच नाही तर हिंदी वेब सिरीज चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. अनेक महिन्यांनी रिंकू आणि आकाश एका कार्यक्रमात एकत्र दिसल्याने दोघांच्याही चाहत्यांना सुखद धक्का बसला.दोघांनीही एकत्र फोटो काढला. यावेळी दोघांच्याही धमाल मस्ती करतानाच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगली आहे.

पुण्यातील एका इव्हेंटला आर्ची आणि परशाने एकत्र हजेरी लावली. निर्माते आणि उद्योजिका उषा काकडे यांच्या नातवाचं बारसं झालं या कार्यक्रमासाठी रिंकू आणि आकाश दोघेही आले होते.गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करून आलेली रिंकू प्रचंड सुंदर दिसत होती. तर आकाश व्हाईट शर्ट आणि जीन्स असा कॅज्युअल लुक मध्ये उठून दिसला.