नागपूरसाठी अतुल लोंढेंना संधी; चंद्रपूर, लातूर, सोलापुरात कुणाची लागली लॉटरी?
मुंबई (प्रतिनिधि) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. दरम्यान हि मुदत संपायला आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. असे असताना अखेर महाविकास आघाडीनेही अंतिम टप्पात जागावाटप निश्चित केले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर अखेर काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 8 जागेवर निवडणूक लढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसने अद्याप आठ पैकी 5 ठिकाणी आपले उमेदवार घोषित केले आहे. मात्र अद्याप 3 जागांचा पेच कायम असून ती नावेही लवकर घोषित होतील अशी माहिती आहे.

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी काँग्रेसचा उमेदवार ठरवण्याच्या उद्दिष्टाने काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक नागपूरात सुरू झाली आहे.पुढील काही वेळामध्ये काँग्रेसचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे नागपूरची निवडणूक बिनविरोध करावी भाजपच्या या आव्हानाला काँग्रेस प्रतिसाद देण्याच्या मूडमध्ये नाही आणि नागपूर आता निवडणूक लढवून संघर्षाच्या भूमिकेत काँग्रेस असल्यास दिसून येत आहे.नागपूरचे रवी भवन मध्ये सुरू असलेल्या या खास बैठकीत माजी मंत्री सुनील केदार, रामटेकचे विद्यमान खासदार श्याम कुमार बर्वे, नागपूर शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील, माजी आमदार राजेंद्र मुळक, नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस हे नेते उपस्थित आहेत.




