महापुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी – सागर भावके
कोल्हापूर (प्रतिनिधी) - चालू वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अद्यापही या शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन एसबी सामाजिक व शैक्षणिक युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तुरंबेचे संस्थापक अध्यक्ष सागर रवींद्र भावके यांनी जिल्हा कृषी उपसंचालक नामदेव परीट यांना दिले.

निवेदनात सागर भावके यांनी सांगितले की, महापुरामुळे काढणीनंतरही सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.
कृषी समृद्धी योजना 2025 अंतर्गत अर्ज सादर करताना अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अजूनही "पेंडिंग" अवस्थेत आहेत, त्यामुळे त्यांना मंजुरी मिळत नाही. हे तांत्रिक अडथळे त्वरित दूर करावेत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करता कर्जमाफीही लवकरात लवकर व्हावी. "जर प्रशासनाने या मागण्यांकडे वेळेत लक्ष दिले नाही, तर शेतकरी चिखल फेक आंदोलन करणार आहेत," असा इशाराही भावके यांनी दिला आहे.




