जास्तीत जास्त घटक पक्षांना एकत्र घेऊन आगामी जिल्हा परिषद लढणार - नाम. चंद्रकांतदादा पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी) - आगामी जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर मध्ये भाजपा महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक हॉटेल अयोध्या या ठिकाणी पार पडली. या बैठकीमध्ये निवडणूक रणनिती, संघटनात्मक मजबुती, जागावाटप तसेच विजयासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. शक्य असल्यास 68 जागांवर युती करा त्याचबरोबर जास्तीत जास्त घटक पक्षांना एकत्र घेऊन आगामी जिल्हा परिषद लढणार असल्याचे सांगत या युतीमधून विरोधकांना फायदा होणार नाही याची दक्षता घेणार असल्याचे नाम. चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.

नाम. चंद्रकांतदादा पाटील पुढे म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी,युवक,महिला यांच्यासाठी राबवण्यात आलेल्या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही महायुतीला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. महानगरपालिकेपेक्षाही मोठा विजय जिल्हा परिषदेमध्ये महायुतीला मिळेल. कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावामध्ये, वाड्यावर विकास गंगा पोहोचवण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार नाम. चंद्रकांतदादांनी केला.
यावेळी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, नाम. हसन मुश्रीफ, खा. धैर्यशील माने, खा. धनंजय महाडिक, आ.विनय कोरे, आ. राहुल आवाडे, आ. अमल महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, समरजितराजे घाटगे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, शौमिका महाडिक, माजी खा. संजय मंडलिक, माजी आ. प्रकाश आवाडे, सुरेश हळवणकर, संजयबाबा घाटगे, महेश जाधव यांच्यासह महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




