अर्थ व शिक्षण सभापती शितल यादव यांचा मोठ्या उत्साहात कार्यालयीन प्रवेश
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण सभापतीपदी शितल प्रवीण यादव यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली.आज बुधवारी 1 एप्रिल रोजी आमदार अशोकराव माने, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम,नुतन जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, उपमहापौर अक्षय जरग जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समिती सभापती विद्या विलास पाटील व बांधकाम समिती सभापती सारिका यशवंत नांदेकर माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयीन प्रवेश झाला.

यावेळी सभापती यादव यांना माजी आमदार राजीव आवळे, आजी, माजी जिल्हा परिषद सदस्य मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर , विजयसिंह माने तसेच वारणा समुहाचे पदाधिकारी कुंभोज मतदार संघातील कार्यकर्ते आदींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सभापती यादव यांच्या कार्यालय प्रवेश यावेळी जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रशासनाने स्वागतासाठी सुंदर अशी सजावट केली होती. कार्यालय प्रवेशानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते शिक्षण व अर्थ समिती सभापती यांचे पूष्पगुच्छ,श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण विभाग तसेच वित्त, बांधकाम, कृषी आरोग्य अधिकारी ,कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




