डीकेटीई मध्ये सहकारमहर्षी स्व. दत्ताजीराव कदम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

डीकेटीई मध्ये सहकारमहर्षी स्व. दत्ताजीराव कदम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

इचलकरंजी (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, सहकारमहर्षी  स्व. दत्ताजीराव कदम यांच्या जयंतीनिमित्त डीकेटीई  राजवाडा येथे संस्थेचे उपाध्यक्ष व माजी मंत्री प्रकाश आवाडे (आण्णा) यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी संस्थेचे ट्रेझरर प्रकाश दत्तवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, ट्रस्टी सुनील पाटील, कार्यकारी संचालक रवी आवाडे, संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे यांच्यासह विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.