श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन
इचलकरंजी (प्रतिनिधी) - स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उज्वल करिअर घडवण्यासाठी अनेक विद्यार्थी अतोनात मेहनत घेत आहेत. स्पर्धा परीक्षेचे बदलते स्वरूप, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, मेरिट या सर्व गोष्टींची तंतोतंत माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन मिळावे, त्यांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा, व त्यांचा आत्मविश्वास वाढवा या दृष्टीने इचलकरंजी येथील श्रद्धा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स वतीने सोमवार 29 डिसेंबर रोजी ठीक 10.00 वाजता श्रद्धा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, गांधी पुतळा, रिक्रेशन हॉल, इचलकरंजी येथे भव्य मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर मार्गदर्शन सत्राला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रणिल गिल्डा (Dysp, मिरज शहर विभाग पोलीस स्टेशन, मिरज) व विशाल पाटील (Tax Assistant, विक्रीकर विभाग,कोल्हापूर) उपस्थित राहणार आहेत. 2026 मधील सर्व स्पर्धा परीक्षेत यश संपादन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रद्धा ज्युनियर कॉलेज मार्फत करण्यात येत आहे.




