श्री.दत्तात्रय हरी चव्हाण कन्या विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

श्री.दत्तात्रय हरी चव्हाण कन्या विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
मिरज:- संजय पवार
सांगलीवाडी येथील श्री.दत्तत्रय हरी चव्हाण कन्या विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्रमुख अतिथी म्हणून मा सौ.प्रेमा जामदार। माजी विद्यार्थिनी व मा.श्री.महेश विष्णू जामदार काॅन्टॅक्टर ,मा.श्री.सुभाष कलकुंबे बजाज अलाईन्स मॅनेजर उपस्थित होते.प्रमुख मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.गजाननराव हरूगडे, सचिव मा. श्री.भगवानराव हरूगडे, संचालक श्री.विठ्ठल चव्हाण उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ चारुशीला हरुगडे यांनी केले.विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
यानंतर प्रमुख अतिथी यांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा परिचय श्री. भारत इंगळे सर यांनी करून दिला.मा. श्री. सुभाष कलकुंबे व श्री .महेश जामदार यांच्या हस्ते विद्यालयाच्या सुकन्या या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.वैशाली पाटील यांनी 2022--2023 या वत्रर्षातील शैक्षणिक उपक्रमांच्या अहवालाचे वाचन केले.
यानंतर विविध क्रीडा व बौद्धिक स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी सौ.प्रेमा जामदार यांनी आपल्या भाषणातून शाळेच्या आठवणी जाग्या केल्या व सर्व विद्यार्थिनींना अभ्यासाच्या टिप्स दिल्या.श्री.महेश जामदार यांनी विद्यार्थ्यांना करीयरच्या विविध संधीचा पुरेपूर उपयोग कसा करायचा व आपले व्यक्तिमत्त्व कसे घडवायचे हे आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केले. त्याचबरोबर श्री. सुभाष कलकुंबे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असणार्या क्वालिटी ओळखून त्यादृष्टीने प्रयत्न करा प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हा.जगाबरोबर चालायला शिका असे विचार व्यक्त केले. यावेळी प्राथमिक विभागाची आदर्श विद्यार्थिनी कु. माही मोहिते व माध्यमिक विभागाची विद्यार्थिनी कु.सानिका पवार यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच प्रमुख मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.गजानराव हरुगडे सचिव श्री भगवानराव हरूगडे,संचालक श्री विठ्ठल चव्हाण,मुख्याध्यापिका सौ. चारुशीला हरुगडे मॅडम यांचे हस्ते करण्यात आला.उपस्थितांचे आभार सौ संगिता घाडगे यांनी मानले, तर सूत्रसंचालन श्री.सुरेश मोरे यांनी केले. यावेळी इयत्ता बालवाडी ते दहावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यावेळी उपस्थित होते.