बारावीचा निकाल जाहीर ; कोल्हापूर विभागाचा ९३.६४ टक्के निकाल

बारावीचा निकाल जाहीर ; कोल्हापूर विभागाचा  ९३.६४ टक्के निकाल

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : बारावीच्या निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. यामध्ये कोकण  विभागाचा सर्वाधिक निकाल लागला असून  गेल्या वर्षीही कोकण विभागाने बाजी मारली होती.

यावर्षी कोकण विभागाने बाजी मारली असून  सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोकण विभाग दहावी-बारावीच्या परीक्षेच बाजी मारत आहे. यावर्षीही कोकणाने ही परंपरा कायम ठेवली आहे. तर सर्वाधिक कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे. 

यंदाही मुलींनीच  मारली बाजी 

बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदाचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 94.58  टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्केवारी  89.51 टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.07 टक्क्यांनी अधिक आहे. 

यंदा निकालाचा टक्का घसरला

यंदा निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के लागला होता. तर, फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के लागला. त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकालाचा टक्का 1.49 ने  घसरला आहे. 

विभागनिहाय निकाल

कोकण : 96.74 टक्के

पुणे :  91.32 टक्के

कोल्हापूर :  93.64 टक्के

अमरावती : 91.43 टक्के

छत्रपती संभाजीनगर :  92.24 टक्के

नाशिक : 91.31 टक्के

लातूर :  89.46 टक्के

नागपूर : 90.52 टक्के

मुंबई : 92.93 टक्के

बारावीची परीक्षा ही सर्वात महत्त्वाची असते. बारावीची परीक्षा झाल्यानंतर आयुष्यात पुढे काय करिअर ऑप्शन निवडायचा हे ठरवू शकतो. त्यामुळे या परीक्षेत चांगले गुण मिळवणे खूप महत्त्वाचे असते. बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे.