भारत अमेरिकन टॅरिफ 'या' तारखेपर्यंत कमी होण्याची शक्यता
India and America Tariff Update - भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) व्ही. अनंत नागेश्वरन यांनी सूचित केले आहे की भारतातील काही उत्पादनांवर अमेरिका लावलेले 25% अतिरिक्त आयात शुल्क लवकरच कमी होऊ शकते. हे शुल्क 30 नोव्हेंबरनंतर मागे घेतले जाऊ शकते, असे ते म्हणाले.

नागेश्वरन यांनी स्पष्ट केले की, भारताकडून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर लावण्यात आलेले 25% बेसिक रेसिप्रोकल टॅरिफ आणि 25% दंडात्मक टॅरिफ अपेक्षित नव्हते. मात्र, अलीकडील घडामोडींमुळे हे टॅरिफ हटवले जाण्याची शक्यता आहे.
16 सप्टेंबर रोजी भारत-अमेरिका अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या व्यापार चर्चेचा उल्लेख करत नागेश्वरन म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या संवादामुळे व्यापार कराराकडे सकारात्मक वाटचाल होत आहे. पुढील चर्चा व्हर्च्युअल स्वरूपात होणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.
अमेरिकेने रशियन तेलाच्या व्यवहारांवर नाराजी व्यक्त करत ऑगस्टमध्ये भारताच्या उत्पादनांवर अतिरिक्त 25% आयात शुल्क लावले होते, ज्यामुळे एकूण टॅरिफ 50% पर्यंत पोहोचले. भारत दरवर्षी अमेरिका बाजारात सुमारे $85 अब्जची निर्यात करतो. वाढीव करांमुळे या निर्यातीवर परिणाम होण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत. जर हे अतिरिक्त टॅरिफ 30 नोव्हेंबरनंतर हटवले गेले, तर भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळू शकतो.




