मुंबईत माजी नगरसेवक निलेश देसाई यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

मुंबईत माजी नगरसेवक निलेश देसाई यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

मुंबई - मुंबई येथे माजी नगरसेवक निलेश देसाई यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. यापूर्वीही मुंबईत माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला होता. यावेळी उपस्थितांनी निलेश देसाई यांचे अभिनंदन करत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  

माजी नगरसेवक निलेश देसाई यांनी दोनदा तर त्यांच्या पत्नी पल्लवी देसाई यांनी एकदा महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. ताराबाई पार्क या प्रभागातून ते निवडून आले होते. जनसंपर्क व  प्रभागातील विकास कामांना प्राधान्य देणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे.