राजे समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
कागल (प्रतिनिधी) - शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष, छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस कागल शहरासह तालुक्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम मंदिरमध्ये महाआरती करण्यात आली. श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुल येथे राही व समर्थ फाउंडेशन आयोजित पोलीस भरती लेखी सराव चाचणी स्पर्धेत तीनशेहून अधिक मुले सहभागी झाली. तर रक्तदान शिबिरात चाळीस जणांनी रक्तदान केले. राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी या स्पर्धेचे उदघाटन केले.अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सविता माने होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

समर्थ फाऊंडेशन,हणबर समाज व कट्टा सर्कल यांचेकडून शाहू स्टेडियमवर पोलीस भरती शारिरीक सराव चाचणी स्पर्धेचे आयोजन केले होते. विरेंद्रसिंहराजे घाटगे यांनी या स्पर्धेचे उदघाटन केले. सोळाशे व आठशे मीटर धावणे व गोळा फेक स्पर्धा घेतली. यामध्ये तीनशे शहात्तर स्पर्धक सहभागी झाले. राष्ट्रीय खेळाडू आश्विनकुमार नाईक व हणबर समाज अध्यक्ष चेतन भगले यांच्या पुढाकाराने झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविले. तर सहभागी खेळाडूंना स्पोर्टस् कीट वाटप केले.
काळ्म्मावाडी धरणग्रस्त वसाहतीत आयोजित रक्तदान शिबिरात पन्नास जणांनी रक्तदान केले. नगराध्यक्षा सविता माने,नगरसेवक प्रकाशराव गाडेकर,आनंदा पसारे आदींनी शिबिराचे उदघाटन केले. संत रोहिदास शाळेत खाऊ वाटप केले. महात्मा फुले मार्केटमध्ये गंगाराम कुंभार यांच्या पुढाकाराने आयोजित जनसेवा शिबिराचे उदघाटन अखिलेशराजे घाटगे यांनी केले. विविध शासकिय योजनांच्या लाभासाठीची नोंदणीसाठीच्या या शिबिराचा पाचशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. ग्रामीण रुग्णालयात फळे,मतीमंद शाळेत विद्यार्थ्यांना भोजन,अनाथ आश्रमात आरोग्य उपयोगी साहित्य वाटपही केले. शहरातील विविध प्रभागांसह गावोगावी नागरिकांना केक व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.




