लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त लोकप्रतिनिधींनी केले अभिवादन

सांगली (प्रतिनिधी) - वाटेगाव ता. वाळवा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त राज्याच्या विविध भागातून विविध राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर व अनुयायी यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक भवनातील अर्ध पुतळ्यास अभिवादन केले. शिल्पसृष्टीस भेट दिली.
यावेळी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख आमदार सदाभाऊ खोत,शरदचंद्र पक्षाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील ,डॉ . भारत पाटणकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र बर्डे ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन ,तहसीलदार सचिन पाटील ,गटविकास अधिकारी आबासाहेब पवार ,रयत क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सागर खोत ,माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, माजी सभापती सुवर्णा जाधव , पोलीस निरीक्षक हरिचंद्र गावडे पोलीस पाटील संतोष करांडे, सरपंच नंदाताई चौगुले, उपसरपंच सोनाली पाटील, दाजी गावडे ,ग्रामसेविका शुभांगी भारती ,तलाठी करिष्मा मुल्ला,माजी सरपंच सुरेश साठे ,प्रकाश पाटील ,राहुल चव्हाण ,राजू बर्डे, सचिन बर्डे,किरण नांगरे , राहूल पाटील , हेमंत मुळीक ,अभिजीत मुळीक ,कौस्तुभ ठोंबरे , सागर पाटील ,पैआनंदराव धुमाळ पै. जयवंत नांगरे, राजेश पाटील , सुधाकर यादव आदींनी अभिवादन केले .आज दिवसभर वाटेगाव ये रस्ते स्मारक भवन परिसर , शिल्पसृष्टी राज्यातील विविध क्षेत्रातील अनुयायी प्रतिनिधी यांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची गावातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी ग्रामस्थ व अनुयायी उपस्थित होते.