सोन्याच्या दरात मोठी घसरण ; जाणून घ्या आजचा दर किती..?

सोन्याच्या दरात मोठी घसरण ; जाणून घ्या आजचा दर किती..?

मुंबई - दिवाळीचा सण संपताच सोन्याची चमक कमी होताना दिसत आहे. आज 24 ऑक्टोबर रोजी देशभरात सोन्याचे दर घसरले आहेत.धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनच्या काळात सोन्याने उच्चांक गाठला होता, मात्र आता त्यात लक्षणीय घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरात घसरण आणि डॉलरच्या मजबुतीकरणाचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या किंमतींवर होत आहे. मागील आठवड्यात सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता, परंतु गुंतवणूकदारांच्या नफावसुलीच्या निर्णयामुळे आणि जागतिक बाजारातील सुस्तीमुळे आता किंमती कमी होताना दिसत आहेत.

सिंगापूर बाजारात सोन्याचा हाजिरी भाव 0.4 टक्क्यांनी घसरून 4,111.40 डॉलर प्रति औंस झाला आहे. मागच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात साधारण 3 टक्क्यांची घट नोंदवली गेली होती.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. शुक्रवारी चांदीचा दर 1,58,900 रुपये प्रति किलोवर आला असून दिवाळीपूर्वीच्या तुलनेत सुमारे 6 टक्क्यांनी कमी झाला आहे.

मुंबई बाजारात सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 1,14,640 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर 1,25,070 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.

आजचे सोन्याचे दर :

10 ग्रॅम सोनं किंमत :

22 कॅरेट – ₹1,15,000

24 कॅरेट – ₹1,25,460

18 कॅरेट – ₹94,090

1 ग्रॅम सोनं किंमत:

22 कॅरेट – ₹11,500

24 कॅरेट – ₹12,546

दिवाळीनंतरच्या या घसरणीमुळे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही संधी ठरू शकते, तर गुंतवणूकदार मात्र बाजारातील पुढील हालचालीकडे लक्ष ठेवून आहेत.