गडहिंग्लज तालुक्यात काँग्रेस ताकदीने निवडणूका लढवणार - पदाधिकाऱ्यांचा निर्धार

गडहिंग्लज तालुक्यात काँग्रेस ताकदीने निवडणूका लढवणार - पदाधिकाऱ्यांचा निर्धार

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज शहर आणि ग्रामीणच्या काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.  कसबा नुल, नेसरी, गिजवणे, भडगांव, हलकर्णी या जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या निवडणुका मोठ्या ताकदीने आणि एकजुटीने लढविण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजना रेडेकर, दिग्विजय कुराडे, प्रशांत देसाई, सोमगोंड आरबोळे, अनिल कुऱ्हाडे, विद्याधर गुरबे, महेश तुर्बतमठ, बाळासाहेब पाटील, गणपतराव डोंगरे, सचिन रेडेकर, रवी चौगुले, जोतीराम केसरकर, रविंद्र पाटील, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.