श्रीराम मंदिरात गणेश जयंती सोहळा भक्तिभावात उत्साहात साजरा

श्रीराम मंदिरात गणेश जयंती सोहळा भक्तिभावात उत्साहात साजरा

कागल (प्रतिनिधी) - ऐतिहासिक श्रीराम मंदिरात गणेश जयंतीचा सोहळा भक्तिमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. निरंजन वायचळ व रितू वायचळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

या प्रसंगी इतिहास अभ्यासिका व लेखिका श्रीमंत नंदितादेवी घाटगे, राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे, वीरेंद्रसिंहराजे घाटगे, श्रेयादेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज परिवारातील सदस्यांसह उपस्थित महिला भाविकांनी जन्मोत्सव उत्साहात साजरा केला.

श्रीराम सेवा भजनी मंडळाच्या वतीने भक्तिरसाने ओथंबलेला हरीभजन कार्यक्रम सादर करण्यात आला. दिवसभर श्री गणेश दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.