द.भा.जैन सभेच्या ‘प्रगति आणि जिनविजय’ चा 120 वा वर्धापन दिन

जयसिंगपूर : शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या ‘प्रगति आणि जिनविजय’ या मुखपत्राचा 120 वा वर्धापन दिन जयसिंगपूर येथे साजरा होत आहे. या निमित्ताने या वर्षी गुजरात राज्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त महासंचालक (एडीजी) प्रकाश मगदूम यांचे ‘समाज : सद्यस्थिती आणि भविष्य’ या विषयावर जाहीर व्याख्यान रविवार दि.30 मार्च रोजी (गुढीपाडवा) जयसिंगपूर येथील सहकारमहर्षी यड्रावकर नाट्यगृह येथे सायं. 4.30 वा. होणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील हे असतील.
मुळचे भिलवडी (जि. सांगली) चे प्रकाश मगदूम हे ‘यु.पी.एस.सी.’ आय.ए.एस. अधिकारी होऊन भारत सरकारचे सनदी अधिकारी म्हणून रूजू झाले. चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या मगदूम यांनी एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून महाराष्ट्र व गुजरातमध्ये नावलौकिक प्राप्त केला आहे. ते कोल्हापूर येथील दिगंबर जैन बोर्डिंगचे माजी विद्यार्थी आहेत. कोल्हापूर-सांगली-इचलकरंजी-जयसिंगपूर परिसरातील तरुणाईने व समाजातील जिज्ञासू श्रोत्यांनी या व्याख्यानाचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन दक्षिण भारत जैन सभेचे मुख्यमहामंत्री व प्रकाशक डॉ. अजित पाटील व ‘प्रगति’ चे संपादक डॉ. महावीर अक्कोळे यांनी केले आहे.