विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत BCCI चा मोठा निर्णय

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत जोरदार चर्चा सुरू होती. अखेर आता बीसीसीआयने या दोघांबाबत मौन सोडले आहे आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विराट आणि रोहित यांना आता टी २० आणि कसोटी क्रिकेटपासून दूर ठेवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. ते भारतासाठी केवळ वनडे क्रिकेट खेळणार आहेत. मात्र, वनडे संघात स्थान मिळवण्यासाठी बीसीसीआयने काही नव्या अटी घातल्या आहेत.
बीसीसीआयने सुरुवातीला त्यांना विजय हझारे ट्रॉफी खेळण्याची अट घातली होती. त्यानंतर त्यांना भारत 'अ' संघातून खेळण्यास सांगितले गेले. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट पुढे आली आहे. बीसीसीआयने कोहली आणि रोहित यांच्याकडून त्यांचे भविष्यातील नियोजन स्पष्टपणे विचारले, तुम्ही पुढील मालिका आणि वनडे क्रिकेटमध्ये किती काळ खेळण्याची तयारी ठेवता. याआधी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी देखील अशीच विचारणा करण्यात आली होती, ज्यानंतर दोघांनाही कसोटी क्रिकेटमधून बाजूला ठेवण्यात आले.
या सर्व घडामोडींवरून बीसीसीआय कोहली आणि रोहित यांच्या खेळातील भवितव्यावर आता ठाम भूमिका घेत असल्याचे स्पष्ट होते. आगामी वनडे मालिका लक्षात घेता, बीसीसीआयने हे मोठे पाऊल उचलले असून आता हे पाहावे लागेल की विराट आणि रोहित काय निर्णय घेतात.