शिवाजी विद्यापीठात तरुणीची आत्महत्या

कोल्हापूर (प्रतिनिधी) - शिवाजी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतिगृह क्र.१ मधील एमए./एम.एस्सी. भूगोल प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने वसतिगृहातील फॅनला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. गायत्री पंढरीनाथ रेळेकर (वय २१, रा. सांगलीवाडी, सांगली) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
सांगलीवाडी येथे राहणारी गायत्री रेळेकर हि तरुणी शिक्षणासाठी कोल्हापुरात आली होती. विद्यापीठातील भूगोल अधिविभागात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला होता. सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वस्तीगृहातील इतर दोन मैत्रिणींसह ती राहत होती. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास गायत्रीने वडिलांना कोल्हापुरात पोहचल्याचा फोन केला. त्यानंतर ही वसतिगृहात परतली.
गायत्री हिच्या मैत्रिणी मैत्रिण वर्ग संपल्यावर वसतिगृहात आल्या . त्यावेळी त्यांना गायत्रीच्या खोलीचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी गायत्रीला हाक मारली परंतु आतून गायत्रीने काही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी खिडकीतून खोलीत बघितले त्यावेळी त्यांना गायत्रीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.