शहर वाहतूक पोलीसांकडून ३२६ जणांवर कारवाई ; २.१२ लाखांचा दंड वसूल

शहर वाहतूक पोलीसांकडून ३२६ जणांवर कारवाई ; २.१२ लाखांचा दंड वसूल

कोल्हापूर (प्रतिनिधी) - ३१ डिसेंबर कोल्हापुरात नेहमीच उत्साहात साजरा केला जातो. काहीजण मित्र - मैत्रिणींसोबत केक कापून नववर्षाचे स्वागत करतात, तर काहीजण कुटुंबासह बाहेर फिरण्याचा आनंद घेतात. मात्र या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने कडक कारवाई करत नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. शहर वाहतूक पोलिसांनी एकूण ३२६ जणांवर कारवाई करून २ लाख १२ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

या कारवाईत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ३८ जणांचा समावेश आहे. ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या ५० जणांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या १८ जणांवर तसेच, सायलेन्सर काढलेल्या ४ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. नववर्षाच्या उत्सवात नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले होते. शिवाय पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता हे स्वतः पाहणी करत होते. कोलहापुरातील विविध ठिकाणी कसून तपासणी सुरू होती.