कोल्हापूरची स्वागत कमान आज पाडली जाणार ; वाहतूक व्यवस्था 'या' प्रमाणे

कोल्हापूरची स्वागत कमान आज पाडली जाणार ; वाहतूक व्यवस्था 'या' प्रमाणे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - विभागीय कार्यालय क्र. ४  ताराराणी मार्केट अंतर्गत तावडे हॉटेल येथील स्वागत कमान जुनी कमान धोकादायक झाली असल्यामुळे प्रशासक तथा आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या पॅनल वरील स्ट्रक्चरल इंजिनियर प्रशांत हडकर यांचा स्ट्रक्चरल अहवाल घेतल. प्रशांत हडकर यांनी दिलेल्या अहवालानुसार आज कमान पाडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. 

तावडे हॉटेल जवळची कमान आज रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या वतीने पाडण्यात घेण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीने तावडे हॉटेल मार्गे कोल्हापुरात येणारी वाहतूक या कालावधीसाठी उचगाव मार्गे वळविण्यात आलेले आहे. तसेच कोल्हापूर शहरातून तावडे हॉटेल मार्गे बाहेर जाणारी वाहतूक छत्रपती ताराराणी चौकातून बावडा रोडने शिये मार्गे वळवण्यात येणार आहे. 

तरी या कालावधीमध्ये कोल्हापूर शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेत केलेल्या बदलाची नोंद घेऊन प्रशासना सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे.