जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या सीईओ पदी सुरेशराव शिंदे यांची नियुक्ती
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सुरेशराव रामराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बुधवार १ एप्रिल २०२६ रोजी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.त्यांनी यापूर्वी राजर्षि शाहू गव्हर्मेट सर्व्ह्ंटस को -ऑपरेटिव्ह बँक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चांगलं कामकाज केलेलं आहे. त्यांच्या या निवडीने सहकार व बँकिंग क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.




