पंकजा मुंडेंना अश्लील फोन कॉल्स, पुण्यातील तरुण अटकेत

पुणे: भाजप नेत्या आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील फोन कॉल आणि आक्षेपार्ह संदेश पाठवून त्रास दिल्याप्रकरणी पुण्यातील एका व्यक्तीस सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई नोडल सायबर पोलिसांकडून सुरू आहे.
मुंबईतील भाजप कार्यालयातील सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे (२६) यांनी नरिमन पॉइंट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि BNS कलम ७८, ७९ अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेतला. पुण्यातून आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या कृत्यामागील हेतू आणि अन्य सहभागींबाबत तपास सुरू आहे.