बिग बॉस फेम,यूट्यूबरच्या कार अपघातानंतरचे मॅनेजरकडून हेल्थ अपडेट शेअर
मुंबई (प्रतिनिधी) : लोकप्रिय युट्यूबर आणि बिग बॉस फेम अनुराग डोभाल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याचा अलिकडेच इन्स्टाग्राम लाईव्ह करत असताना अपघात झाला. त्यानं आपल्या व्हिडिओतून मानसिक त्रास होत असल्याचं स्पष्ट केलं. तसेच आपल्या कुटुंबावर गंभीर आरोपही केले. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान, त्याला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले आहे. अलिकडेच अनुरागचा मॅनेजर रोहित पांडेने हेल्थ अपडेट दिली आहे. अनुरागची प्रकृती गंभीर असल्याचं त्यानं सांगितलं. तसेच चाहत्यांना अनुरागसाठी प्रार्थना करा, असे आवाहन केले आहे.

गेल्या रविवारी, अनुराग डोभालने चालत्या कारमधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानं इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत टोकाचे पाऊल उचलले, असं बोललं जात आहे. अपघात घडल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.गेल्या सात दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, शनिवारी सकाळी अनुरागच्या मॅनेजरने त्याच्या आरोग्यविषयक माहिती दिली आहे. अनुरागच्या मॅनेजरने एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
अनुरागने पोस्टमध्ये लिहिलं की, 'आज सकाळपर्यंत अनुरागची प्रकृती स्थिर होती.दरम्यान,आता त्याची प्रकृती बिघडत चालली आहे. अपघातात त्याच्या फुफ्फुसांचे प्रचंड नुकसान झाल. ज्यामुळे गंभीर इन्फेक्शन झाले होते. त्याला सीव्हिअर निमोनिया डायग्नोजचे निदान झाले आहे.सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार घेत आहे. मी सर्वांना अनुरागसाठी प्रार्थना करण्याची विनंती करतो', असं अनुरागच्या मॅनेजरनं म्हटलं आहे.
गुरुवारी अनुरागला आयसीयूमधून डिस्चार्च देण्यात आला आहे. रोहितने त्याच्यासोबतचा बेडवर झोपलेला फोटो शेअर केला आहे. त्यानं फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'अनुराग सध्या आयसीयूमधून बाहेर आहेत. आम्ही त्यांच्यासोबत 24/7 आहोत. अनुरागसाठी प्रार्थना करा', असं म्हणत त्यानं चाहत्यांना आवाहन केलं आहे. सध्या मॅनेजरची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
अनुरागने त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्याचे कुटुंब अनुरागच्या आतंरजातीय विवाहाच्या विरोधात होते. लग्नानंतर त्याला मानसिक छळ सहन करावा लागला. त्यानं यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला, तसेच हा आपला शेवटचा व्हिडिओ असल्याचं म्हटलं. त्यानं व्हिडिओत म्हटलं की, जर त्याला काही झालं तर, त्याचे पालक आणि भाऊ जबाबदार असतील.




