कोल्हापूरच्या रस्ते विकासासाठी खासदार शाहू छत्रपती यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट

कोल्हापूरच्या रस्ते विकासासाठी खासदार शाहू छत्रपती यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : खासदार श्री शाहू छत्रपती यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्ते विकास कामांसाठी केंद्रीय रस्ते निधी (CRF) अंतर्गत प्रस्ताव सादर केला. जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रस्ते राष्ट्रीय महामार्गांना जोडणारे असल्याने त्यावर जड वाहनांची मोठी वाहतूक होत असून रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री शाहू छत्रपती यांनी सुमारे ५८ कोटी रुपयांच्या पाच कामांचा प्रस्ताव मांडला. प्रस्तावित कामे पुढीलप्रमाणे 

1.आरे–सडोली खालसा–हिरवडे–हासूर दुमाला–राशिवडे बुद्रुक–शिरगाव रस्ता (MDR 29 ते MDR 35), ता. करवीर – रस्ता सुधारणा, रुंदीकरण, बीटी/काँक्रीट, पूल व आरसीसी गटर (₹20 कोटी).

2.एसएच-178 ते सरवडे–माळवे–तुरंबे–तलाशी–माजगाव–ठिकपूरळी रस्ता (MDR 98), ता. राधानगरी – कि.मी. 2/800 येथे मोठा पूल बांधकाम (₹17 कोटी).

3.एसएच-177 ते पारखंदळे–आकुर्डे–हरपवडे–गवशी–धुंदवडे–जारगी–गारिवडे–गगनबावडा रस्ता (MDR 39), ता. राधानगरी – कि.मी. 13/00 ते 17/00 रस्ता सुधारणा (₹10 कोटी).

4.गारिवडे हॉस्पिटल–बोर्बेट–तळिये खुर्द, ता. गगनबावडा (MDR 39) – रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण (₹6 कोटी).

5.मल्हारपेठ–सुने–कोडवडे–वेटवडे–म्हसुरळी ते MDR-34 जोडणारा MDR-26 रस्ता, ता. पन्हाळा (गोगवे–वेटवडे भाग) – रुंदीकरण व मजबुतीकरण (₹5 कोटी).

या रस्त्यांचे काम झाल्यास ग्रामीण भागातील संपर्क सुधारण्यास तसेच वाहतूक आणि मालवाहतुकीला मोठी मदत होणार असल्याचे खासदार छत्रपती यांनी सांगितले.