पवार ट्रस्टच्या पत्रलेखन स्पर्धेत श्रेया सुतार प्रथम

पवार ट्रस्टच्या पत्रलेखन स्पर्धेत श्रेया सुतार प्रथम

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जागतिक टपाल दिनानिमित्त (९ ऑक्टोबर) रोजी कै. सौ. हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट, राज प्रकाशन आणि राजर्षी शाहू अध्यासन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या सोशल मीडियाचे युगात शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना पत्रलेखनाचे महत्त्व कळावे आणि पत्रलेखनाची परंपरा त्यांनी जपावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली होती. 

सदर स्पर्धेत ५५ शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील उत्कृष्ट पत्रलेखन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व ग्रंथ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले आई, वडील, काका, भाऊ यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपले मत मांडले, विचार व्यक्त केले. 

स्पर्धेचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जे. के. पवार, प्रा. डॉ. दिग्विजय पवार, श्रद्धा पवार यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण राजकुंवर पवार - डफळे यांनी केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - 

प्रथम क्रमांक -  श्रेया सर्जेराव सुतार (राजवीर पब्लिक स्कूल, वाशी)

द्वितीय क्रमांक (विभागून) -  मानसी माळी (परशुराम विद्या मंदिर, गगनबावडा) व शिवानी रंगराव भित्तम (परशुराम विद्या मंदिर, गगनबावडा)

तृतीय क्रमांक -  ऋतुजा भीमराव पुकळे (राजवीर पब्लिक स्कूल, वाशी)

चतुर्थ क्रमांक (विभागून) - साक्षी पांडुरंग इंजर (परशुराम विद्या मंदिर, गगनबावडा) व  प्राजक्ता शिवाजी बरगे (परशुराम विद्या मंदिर, गगनबावडा)

पाचवा क्रमांक (विभागून) - सृजन नि. पाटील (राजवीर पब्लिक स्कूल, वाशी) व श्रावणी सुभाष चौगले (परशुराम विद्या मंदिर, गगनबावडा)

उत्तेजनार्थ - आर्या तानाजी डवर (परशुराम विद्या मंदिर, गगनबावडा) व वैदेही नागेश कुंभार (परशुराम विद्या मंदिर, गगनबावडा)