मंत्री हसन मुश्रीफ यांनी छ. संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त केले अभिवादन
कागल (प्रतिनिधी) - कागलमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पुतळ्याला मनोभावे अभिवादन केले. निपाणी वेस येथील छत्रपती संभाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी "छत्रपती शिवाजी महाराज की जय", "छत्रपती संभाजी महाराज की जय", "जय भवानी जय शिवाजी" या घोषणांनी परिसर दणाणला.

यावेळी कागलचे माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे, कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील, नवाज मुश्रीफ, राजे विक्रमसिंह घाटगे कागल को- ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक रंणजित पाटील, रोहित पाटील, युवराज लोहार, विष्णू कुंभार, गणेश कांबळे, नितीन रेडेकर, संतोष स्वामी, रणजीत माळी, अशोक टेंगे आदी प्रमुख उपस्थित होते.




