शरद कृषी महाविद्यालयात वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा संपन्न

शरद कृषी महाविद्यालयात वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा संपन्न

जैनापूर - जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा संपन्न झाल्या. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत या स्पर्धेत २१ महाविद्यालयातील १२७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये सर्वसाधारण विजेतेपदासह प्रथम क्रमांक पुणे कृषी महाविद्यालयाने बाजी मारली. त्यानंतर व्दितीय क्रमांक बारामती कृषी व कडेगाव कृषी महाविद्यालय, तर तृतीय क्रमांक धुळे कृषी महाविद्यालयाने पटकाविला. विजेत्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. व्ही आर. आवारी यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. 

दरम्यान स्पर्धेचे उदघाटन डॉ. मनीषा भोजकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. सारिका कोळी, राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेश कांबळे प्रमुख उपस्थित होते.

स्पर्धेसाठी आमंत्रित केलेल्या महाराष्ट्रातील विविध भागातील १३ तज्ञ परीक्षकांनी विविध गटानुसार आपला निकाल दिला. यावेळी डॉ. आवारी यांनी अशा स्पर्धाना विद्यार्थ्यांचा अजून सहभाग वाढावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे सांगितले. तसेच स्पर्धा व कार्यक्रमाच्या सूत्रबद्ध नियोजना बद्दल शरद कृषी महाविद्यालयाचे कौतुक केले.

यावेळी परिक्षक प्रा. पियुष मालपुरे, प्रा. विजय लोंढे व प्रा. गणेश लोंढगे यांनी अभिप्राय देताना अशा स्पर्धेत सहभागासाठी संदर्भ देताना सोशल मिडियाच्या अनावश्यक वापराबाबत खंत व्यक्त करत गूगल, चॅटजीपीटी पेक्षा वाचनाची गरज असल्याचे नमूद केले. शेवटी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. आर. कोळी यांनी विद्यापीठाने दिलेल्या आयोजनाच्या संधीबाबत आभार व्यक्त करत सर्व स्पर्धेकांचे अभिनंदन केले. 

या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेच्या नियोजनात शरद कृषीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. दादासाहेब मगदूम यांनी मोलाचा वाटा उचलला. त्यांना महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. तसेच कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे प्रा. मुकुंद गुंड यांचे सहकार्य लाभले. 

स्वागत व प्रस्तावना प्राचार्य डॉ. कोळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पूजा भोसले व प्रा. एस. वी. चव्हाण यांनी केले. आभार डॉ. एस. एन. बन्ने यांनी मानले.