आरोग्य हेच खरे धन,नियमित आरोग्य तपासणी काळाची गरज : तहसीलदार अनंत गुरव
करवीर प्रतिनिधी - आरोग्य हेच खरे धन असून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून घेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे तहसीलदार अनंत गुरव यांनी केले.प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कोगे, अथायु हॉस्पिटल आणि मंगलमूर्ती तरुण मंडळ, मेन रोड, कोगे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या आरोग्य शिबिरात जवळपास १०० नागरिकांची रक्तदाब व मधुमेहाची तपासणी करण्यात आली. तसेच २५ नागरिकांची ईसीजी तपासणी करण्यात आली. यावेळी नागरिकांना डॉक्टरांचा मोफत सल्ला तसेच औषधांचे वाटप करण्यात आले.ग्रामीण भागात अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे कौतुकास्पद असून, या माध्यमातून गोरगरीब आणि गरजू नागरिकांना मोठा आधार मिळतो, असेही तहसीलदार अनंत गुरव यांनी सांगितले.
शिबिराला उदय कोठावळे, प्रकाश सखाराम पाटील, कसबा बीडचे माजी सरपंच सत्यजित पाटील, बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय सुतार, ज्येष्ठ मार्गदर्शक गोविंद दत्तात्रय मोरे, प्राथमिक आरोग्य केंद्र सांगरूळच्या डॉ. घुणकीकर, आरोग्य सहाय्यक मगर, हजारे मॅडम, डॉ. स्नेहल माने, कोतेकर सिस्टर, धनाजी जांभळे, अनिता घराळ, सर्व आशा वर्कर्स तसेच अथायु हॉस्पिटलच्या डॉ. रोहिणी, सिस्टर माया, हर्षवर्धन शांतिनाथ , मंगलमूर्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण, उपाध्यक्ष नितीन मिठारी, कुंडलिक चव्हाण, विश्वनाथ मोरे, संग्राम पाटील, ऋतुराज मोरे, चैतन्य हारुगले, भाऊसो पवार, संदीप चव्हाण, देवजी मोरे, नवनाथ मोरे, बाळासो पवार यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंगलमूर्ती तरुण मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. शिबिरासाठी केलेल्या नियोजनाबद्दल उपस्थित नागरिकांनी मंडळाच्या सदस्यांचे कौतुक केले.




