उचगाव येथील विश्वशांती बौद्ध विहार उद्घाटन आ. सतेज पाटील यांच्या हस्ते संपन्न ..!

कोल्हापूर - उचगाव येथील विश्वशांती बौद्ध विहार समितीकडून आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बौद्ध विहार उद्घाटन सोहळा माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या उपस्थितीत आ. सतेज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी उचगावचे माजी सरपंच गणेश बाबू काळे, सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच राहुल मोळे, ग्राम. सदस्य श्रीधर कदम, वैजयंती यादव, सचिन देशमुख, यांच्यासह धनाजी कांबळे, विजय घोडके, सुशील कोल्हटकर, सम्राट अशोक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य, आजी - माजी ग्रामपंचायत सदस्य, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.