चिंटूची गंमत जंमत शाळा' उपक्रम राबविणारी उचगावची कुमार विद्यामंदिर जिल्ह्यातील पहिली शाळा

चिंटूची गंमत जंमत शाळा' उपक्रम राबविणारी उचगावची कुमार विद्यामंदिर जिल्ह्यातील पहिली शाळा

उचगाव (प्रतिनिधी) : इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्या कोवळ्या मुलांना शाळेची पायवाट माहीत व्हावी, नवीन शाळेची ओळख व्हावी ,नवीन सोबती, नवीन शिक्षक माहिती व्हावेत या उद्देशाने कुमार विद्यामंदिर उचगाव मध्ये चिंटूची गंमत जंमत शाळा या उपक्रमाने इयत्ता पहिलीच्या वर्गाला आज गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजीमोठ्या दिमाखात प्रारंभ झाला.  कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे नवनियुक्त अर्थ समिती सदस्य नामदेवराव वाईंगडे आणि उचगाव ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच  मधुकर चव्हाण तसेच पंचायत समितीचे उचगाव मतदार संघाचे लोकप्रतिनिधी तानाजी कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक रेडेकर उपाध्यक्ष, सुदर्शन सावंत, ग्रामपंचायतचे सदस्य अरविंद शिंदे, शिक्षण प्रेमी विनोद थोरात, मुख्याध्यापक संजय लोंढे सर्व ग्रामपंचायत सदस्य ,सर्व शाळा व्यवस्थापन सदस्य, कुमार विद्यामंदिर चे सर्व शिक्षक स्टाफ ,नवीन प्रवेश घेणाऱ्या मुलांचे पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेने सुरू केलेले या उपक्रमाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या विविध उपक्रमाचे प्रत्येक पालकांच्याकडून कौतुक झाले विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश घेण्यास प्रोत्साहन देऊन सहकार्य केल्याबद्दल सर्व अंगणवाडी ताईंचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.

कुमार विद्यामंदिर उचगावची प्रगती सर्वोत्कृष्ट असून भविष्यात शाळेला लागणाऱ्या सर्व गरजांची पूर्तता करून देण्याचे अभिवचन याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य नामदेवराव वाईंगडे यांनी दिले. शाळेने जिल्हा तसेच तालुका पातळीवर गुणवत्ता यादीत मुलांना आणल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांनी मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. कुमार विद्यामंदिर चे शिक्षण प्रेमी विनोद थोरात यांनी इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी फर्स्ट एड बॉक्स शाळेसाठी भेट म्हणून दिला कार्यक्रमाचे आभार उप मुख्याध्यापक गीता कोरवी यांनी मानले.