छ. शाहू महाराजांच्या विचारावर चालणारा कोल्हापूर जिल्हा - पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता

छ. शाहू महाराजांच्या विचारावर चालणारा कोल्हापूर जिल्हा - पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता

करवीर (विश्वनाथ मोरे) - पोलिसांचे कार्यक्रम सुद्धा हाउसफुल होऊ शकतात हे कोल्हापूरमध्येच शक्य आहे. एकत्रित गणेशोत्सव व मोहरम सण साजरा करणारा उत्कृष्ट नमुना कोल्हापूरचं होय. छत्रपती शाहू महाराजांची विचारावर चालणारा कोल्हापूर जिल्हा असे गौरवोद्गार पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी काढले.कोल्हापूर जिल्हा पोलिस दल, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व करवीर विभाग यांच्या वतीने गणराया ॲवॉर्ड 2025 आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. 

पोलीस प्रशासन कार्यक्रम म्हणजे नियम, नियोजन,आणि शिस्त अशा पद्धतीचे स्वरूप असणारा कार्यक्रम पण यावर्षीचा गणराया अवॉर्ड हा पारंपारिक वारकरी संप्रदाय ह भ प युवा कीर्तनकार ओंकार महाराज सूर्यवंशी यांचे बाल वारकरी नृत्य व अभंग आणि प्रल्हाद पाटील यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गायनाने झाली.

करवीर पोलीस ठाणे गणराय अवॉर्ड 2025 - 

प्रथम क्रमांक श्री राधाकृष्ण कला क्रीडा सामाजिक व सांस्कृतिक मंडळ सांगरुळ, द्वितीय क्रमांक जय शिवराय तरुण मंडळ पर्याग चिखली, तर तृतीय क्रमांक वल्लीसो तरुण मंडळ वडणगे या गणेश मंडळांना मिळाला. 

करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गणराय अवॉर्ड 2025 - 

प्रथम क्रमांक श्री राधाकृष्ण कला क्रीडा सामाजिक व सांस्कृतिक मंडळ सांगरूळ, द्वितीय क्रमांक झलक फ्रेंड्स सर्कल कसबा सांगाव तर तृतीय क्रमांक, चौकार मित्र मंडळ शिये या गणेश मंडळांना मिळाला. 

करवीर व उपविभागामध्ये राधाकृष्ण तरुण मंडळ सांगरुळ यांनी अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा सजीव देखावा केल्याबद्दल त्यांना यावर्षीचे उत्कृष्ट मंडळ म्हणून जाहीर करण्यात आले.

तसेच, पारंपारिक वाद्य,बॅन्जो, लेझीम पथक,लोकप्रबोधनात्मक कार्यक्रम,रक्तदान शिबिर, असे अनेक विविध उपक्रम ज्या ज्या मंडळांनी राबवले. कार्यक्रम केले त्या सर्व मंडळांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर समाजामध्ये होणारे कार्यक्रम सोशल माध्यमातून प्रसिद्ध करून देणारे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब चैनल व पत्रकार आदींचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी करवीर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सुजीत कुमार शिरसागर,करवीर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे,कागल पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड,गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक तब्बसुम मगदूम,इस्पुर्ली पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक मुद्दस्सर शेख,मुरगुड पोलीस सहा.निरीक्षक शिवाजी करे,यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर . करवीर, गांधीनगर, मुरगूड, कागल, इस्पूर्ली, गोकुळ शिरगाव आदि पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी, प्रत्येक गावातील पोलीस पाटील,सत्कारमूर्ती असणाऱ्या तरुण मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.