शिवराज्याभिषेकासाठी रायगडावर येणाऱ्या शिवभक्तसाठी मराठा सेवा संघाकडून १२ हजार ओ.आर.एस. सॅचेट्स सुपूर्द
कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगामी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी गडावर येणाऱ्या शिवभक्तांच्या आरोग्याची आणि सुविधेची काळजी घेण्यासाठी 'मराठा सेवा संघा'च्या वतीने १२,००० ओ.आर.एस. (ORS) सॅचेट्स शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता गडावर येणाऱ्या शिवभक्तांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये, या सामाजिक जाणिवेने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला.

हे सॅचेट्स सुपूर्द करताना मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अश्विनकुमार वागळे, जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी हातकर, प्रवीण पाटील आणि जिल्हा संघटक सुशांत निकम प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच या कार्यात जिजाऊ ब्रिगेडचाही मोठा सहभाग लाभला असून, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय कार्याध्यक्ष चारुशीला पाटील, जिल्हाध्यक्ष वनिता निंबाळकर, जिल्हा सचिव सुमन वागळे, जिल्हा कार्याध्यक्ष स्मिता कोकाटे आणि शहराध्यक्ष पत्वरिता पाटील यांनीही आपली उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी अभिषेक कित्तूर, श्रावण पाटील, प्रदीप वरपे यांच्यासह मराठा सेवा संघाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा सेवा संघाच्या या कौतुकास्पद आणि सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाबद्द युवराज्ञी संयोगिता राजे व शिवराज्याभिषेक सोहळा समितीने त्यांचे विशेष कौतुक केले




