जि. प. च्या भाऊसिंगजी रोडवरील जागेवर नवीन इमारत उभारण्याच्या स्थायी समिती सभेत अध्यक्षांच्या सूचना

जि. प. च्या भाऊसिंगजी रोडवरील जागेवर नवीन इमारत उभारण्याच्या स्थायी समिती सभेत अध्यक्षांच्या सूचना

कोल्हापूर (प्रतिनिधी )जिल्हा परिषदेच्य मालकीची भाऊसिंगजी रोडवरील इमारत निर्लेखित करून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी त्या मुळे जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढणार आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विधितज्ञ नेमण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी स्थायी  समिती सभेत दिल्या. या सभेत विभागनिहाय आढावा घेण्यात आला. यामध्ये सदस्यांना बजेटची प्रत स्थायी समिती सभा किंवा सर्वसाधारण सभेपूर्वी आठवडाभर अगोदर देण्याची मागणी सदस्यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडे केली.

घनकचरा व्यवस्थापनबाबत जिल्ह्यातील सर्व प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला वाहन देण्याची तरतूद प्रस्तावित असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मीन यांनी सांगितले. याबाबत ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा आयोजित करून ग्रामस्थ, शाळा- हायस्कूलमधील विद्यार्थी यांना सहभागी करून घेण्यात यावे, अशीसूचनाही त्यांनी केली.खरीप हंगाम सुरू झाला असून, शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासू नये, यासाठी पालकमंत्र्यांना सूचित करून खताची आवक होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी सांगितले. या सभेस जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सदस्य तसेच अधिकारी उपस्थित होते.