पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कोल्हापुरच्या प्राची लाखे हिचा युवासेनेच्या वतीने सत्कार

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कोल्हापुरच्या प्राची लाखे हिचा युवासेनेच्या वतीने सत्कार

कोल्हापूर - प्राची लाखे ही मेन राजाराम महाविद्यालयाची विध्यार्थीनी आहे. जन्मापूर्वीच वडीलांचे छत्र हरवले, म्हणून आईला हातभार म्हणून लहानपना पासूनच संघर्षमय परिस्थितीचा सामना करण्यासाठी ती काम करू लागली. सकाळी कॉलेज व 11 नंतर पेट्रोल पंपावर काम अशा संघर्षमय वातावरणात देखील तिने 12 वी मध्ये 75% गुण मिळवले, म्हूणन या उत्तम कामगिरी बद्दल आज कोल्हापूर युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला व भावी आयुष्यात कोणतीही मदत लागली तर युवासेना सोबत आहे, असा आधार देखील दिला.

यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, महानगर प्रमुख सनराज शिंदे, शहर प्रमुख सुमित मेळवंकी, युवती शहर प्रमुख सानिका दामूगडे, शहर समन्व्यक रोहित वेढे, उपशहर युवती अधिकारी सिद्धी दामूगडे आदी उपस्थित होते.