सर पिराजीराव घाटगे यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पिराजीराव घाटगे शारीरिक शिक्षण धर्मादाय विश्वस्त निधी, कोल्हापूर संचलित भवानी जलतरण तलाव (गोखले कॉलेजसमोर) येथे श्रीमंत पिराजीराव घाटगे उर्फ बापूसाहेब महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेचे आयोजन केले आहे.

रविवारी दि. १५ मार्च रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत दिवसभर चालणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १९ जलतरण तलावांमधील १६० जलतरणपटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धांमुळे जिल्ह्यातील जलतरणपटूंना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळणार असून क्रीडाप्रेमींना उत्कृष्ट जलतरणाचे दर्शन घडणार आहे.सदर जलतरण स्पर्धा जलतरण शौकीन व इतर खेळाडूंना विनामूल्य पाहता येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जलतरणप्रेमी व क्रीडापटूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.




