सोन्याच्या दरात मोठी उसळी, पहा आजचा दर किती..?

मुंबई - गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने चढ - उतार होताना दिसले. आठवड्याची सुरुवात जोरदार झाली असून, मंगळवारी सोन्याच्या किंमतीत तब्बल ₹1200 रुपयांची मोठी वाढ झाली. आजही MCX वायदा बाजारात सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली असून, सध्या दर ₹ 97,310 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
इराण - इस्रायल संघर्षाच्या शमणानंतर एक कालावधी घसरणीचा होता, परंतु मंगळवारी भारतात सोन्याच्या किंमतीत पुन्हा उसळी पाहायला मिळाली. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर ₹90,210 तर 24 कॅरेटचा दर ₹98,410 प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. चांदीच्याही किंमतीत वाढ नोंदवली गेली असून, ती ₹100 रुपयांनी वाढून ₹1,10,100 प्रति किलो झाली आहे.
फ्युचर्स मार्केटच्या बाबतीत, ऑगस्ट 2025 सोन्याचे वायदे किंचित घसरून ₹97,200 प्रति 10 ग्रॅमवर आले असून, त्यात 0.05% ची घट झाली आहे. सप्टेंबर 2025 चांदीचे वायदेही 0.42% नी घसरून ₹1,06,263 प्रति किलो झाले आहेत.
भारतात सोन्याच्या किंमतीत बदल होण्यामागील मुख्य घटक कोणते ?
भारतातील सोन्याच्या दरावर आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, आयात शुल्क, कर प्रणाली आणि रुपयाच्या विनिमय दरातील चढउतार यांचा मोठा परिणाम होतो. भारतात सोनं हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून, सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे. विशेषतः लग्नसराई आणि सण - उत्सवांच्या काळात याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते.
बाजारातील सतत बदलणाऱ्या ट्रेंडमुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. योग्य निर्णय घेण्यासाठी आणि संभाव्य बदल समजून घेण्यासाठी नियमित अपडेट्सवर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.