आंबुबाई स्कुलचे विद्यार्थी जिल्ह्यात नावलौकिक मिळवतील- डॉ. गोपाळ गावडे

आंबुबाई स्कुलचे विद्यार्थी जिल्ह्यात नावलौकिक मिळवतील- डॉ. गोपाळ गावडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - मुलांनी परिक्षेत कमी गुण मिळविले म्हणून पालकांनी रागावू नयेत. मुलांना विश्वासात घेऊन समजावून सांगितले तर विद्यार्थी निश्चित यशस्वी होतील. आंबुबाई शिक्षण संस्थेचे विद्यार्थी निश्चित जिल्ह्यात नावलौकिक मिळवतील असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गोपाळ गावडे बोलत होते. अध्यक्षस्थानी तुकाराम टिक्के पाटील हे होते.

यावेळी १० वी परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच पालक मेळावा व सेवानिवृत्त सत्कार आयोजित केला होता. प्राचार्य के.डी.पाटील यांनी हजारो आदर्श विद्यार्थी घडवून समाजहित जपले असल्याचे अध्यक्ष भाषणात टिक्के पाटील यांनी सांगितले.विद्यार्थ्यांनी आई वडिलांच्या कष्टाला तडा जाऊ न देता एकाग्रतेने अभ्यासात चिकाटी ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे प्राचार्य के.डी.पाटील यांनी सांगितले.

यावेळी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात गोपाळ गावडे, प्राचार्य के.डी.पाटील, मुख्याध्यापिका शकुंतला पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.सेवानिवृत झालेले प्राध्यापक गोपाळ गावडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी तुकाराम टिक्के पाटील, एस.के.पाटील आदींसह विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी प्राचार्य तेजस पाटील, ॲड. विजयकुमार कदम,उपप्राचार्य निर्मला केसरकर, मुख्याध्यापिका एस. के. पाटील, श्रेयस पाटील,शिक्षिका नंदा देसाई, शोभा पाटील यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.