कळंबा तलाव संरक्षण व संवर्धन आंदोलन यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंबा येथे कळंबा तलाव संरक्षण व संवर्धन आंदोलन यांच्या वतीने सामाजिक न्यायाचे प्रणेते, रयतेचे राजे, शिक्षणाचे खरे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.आज राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक कळंबा तलाव येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. यावेळी मा. सरपंच सागर भोगम,नगरसेविका नेहा तेंडुलकर, सुनील वाडकर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष- संग्राम जाधव, प्रकाश टोपकर, सुहास निकम, श्रीकांत पाटील, उत्तम जाधव अशोक बराले,रोहित जगताप, रोहित निकम,राज नरके बाजीराव पोवार, महादेव खानविलकर दत्तात्रय गौड, पप्पू पाटील, दिपक तिवले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




