गुटखा वाहतूक करणाऱ्या एकास अटक ; १ लाख १९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

गुटखा वाहतूक करणाऱ्या एकास अटक ; १ लाख १९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) - गुटखा वाहतूक करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. महावीर राजगोंडा पाटील, वय ५२, रा. अंबाईनगर, रेंदाळ ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्याकडून प्लास्टीक पोते व पिशवीमध्ये केसरयुक्त विमल पान मसाला, आय एम डी वगैरे असा एकूण ४९ हजार २०० रुपये किंमतीचा गुटखा तसेच मोटार सायकल व मोबाईल हॅन्डसेट असा एकुण १ लाख १९ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पथकाला माहिती मिळाली की, महावीर पाटील हा हुपरी येथे अवैध गुटख्याची वाहतूक करणार आहे. पथकाने मिळालेल्या माहितीनुसार, जवाहरनगर रोड हुपरी येथे सापळा रचून महावीर पाटील याला ताब्यात घेतले. पुढील तपास हुपरी पोलीस करीत आहेत. 

या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, अंमलदार प्रविण पाटील, दिपक घोरपडे, सत्यजीत तानुगडे, अमित सर्जे, युवराज पाटील, निवृत्ती माळी यांच्यासह आदी पोलीसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.