सेंट पाॅल्स इंटरनॅशनल स्कूल आळते येथे दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न

सेंट पाॅल्स इंटरनॅशनल स्कूल आळते येथे दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - आळते येथील रामलिंग रोडवरील सेंट पाॅल्स इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा दिपावली निमित्त "दीपोत्सव" कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली कार्यक्रमांमध्ये वेगळ्या प्रकारचे नृत्यकला, गायन, रेकॉर्ड डान्स, दांडिया नृत्य इत्यादींचे सादरीकरण झाले. पालकांनीही मोठ्या उत्स्फूर्तपणे सर्व कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रमांमध्ये शाळेच्या मुलांकडून फूड स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल्सवर पालकांनी गर्दी करून विद्यार्थ्याने बनवलेल्या पदार्थांवर मनमुरादपणे आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांच्या आनंदात मोलाची भर घातली. पालकांनीही गायन नृत्य सर्व प्रकारच्या कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमात किरण इंगवले तसेच संस्थेचे चेअरमन यांचे सुपुत्र जेसन राव यांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमासाठी प्रिन्सिपल वृषाली मगदूम व शाळेचा संपूर्ण स्टाफ यांनी अपार कष्ट घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदन बन्ने यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन राजकुमार राव व संस्थेचे सेक्रेटरी महेश राव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

यावेळी आळते, हातकणंगले, इचलकरंजी, रूकडी, कुंभोज, अतिग्रे व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.