ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. सुमारे पाच दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि अखेर आज त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

अभिनेते असरानी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यामधील सर्वात गाजलेली आणि आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेली भूमिका म्हणजे शोले चित्रपटातील विनोदी जेलरची. “हम अंग्रेज के जमाने के जेलर हैं” या प्रसिद्ध डायलॉगमुळे हे पात्र अजरामर झाले.
आपल्या साहसीपणाचा आव आणणारा, पण प्रत्यक्षात अगदी वेगळ्या स्वभावाचा हा जेलर आजही प्रेक्षकांच्या आठवणीत तितकाच ताजा आहे. या भूमिकेची व्हिडिओ क्लिप्स आणि रील्स अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.




